पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा कोरोनाचा रिपोर्ट आज दुपारी ‘पॉझिटीव्ह’ आला आहे. त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांचा रिपोर्ट येण्यापूर्वी आज सकाळी एका उद्घघाटनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी चिंचवडचे आमदार, महापौरांसह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
नाना काटे यांचा कोरोनाचा रिपोर्ट दुपारी ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. मात्र सकाळी ११ वाजता साई चौक, जगताप डेअरी येथील ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन महापौर माई ढोरे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पार पडले आहे. या कार्यक्रमासाठी नाना काटे यांनी हजेरी लावली होती.
सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, संदिप कस्पटे, नगरसदस्या निर्मला कुटे, ममता गायकवाड, आरती चोंधे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group