पिंपरी (Pclive7.com):- नेशन हेल्पच्या वतीने खराळवाडी येथे सुरू केलेल्या मोफत श्री अग्रसेन कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हेल्प नेशन संस्थेचे अध्यक्ष सुनील जयकुमार आगरवाल, ॲड.सुशील मंचरकर, क्रिस्टल हॉटेलचे संचालक बशीर सय्यद, रिपब्लिकन पार्टीचे अजीज शेख, नेशन हेल्प संस्थेचे अमन देविचंद आगरवाल, गोपाल आगरवाल, आशिष आगरवाल, अनिल पटेल, रमेश गोयल, डॉ. सुहास भोसले, अतुल बंडल आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले कि, आपली लढाई ही रोगाशी आहे, रुग्णासोबत नाही. या लढाईत सर्वांनी एकत्र येवून लढायचे आहे. कोरोनाच्या संकटात आगरवाल बांधवांनी पुढाकार घेवून साडेचार महिने गोरगरिबांना अन्नधान्य आणि जेवण देवून जनतेची सेवा केली आहे. आगरवाल समाजाचा आदर्श घेवून इतर संस्थांनी समाज सेवेसाठी पुढे यावेत असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष सुनील आगरवाल म्हणाले कि, आम्ही १५ मित्र एकत्र येवून नेशन हेल्प संस्था स्थापन केली. प्रथमच एका हॉटेलमध्ये महापालिकेच्या मान्यातेने १०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. या केंद्रात कोरोना रुग्णांना औषधोपचार, जेवण, डॉक्टरासह वैद्यकीय सेवा मोफत पुरविली जाणार आहे. संस्थेच्या वतीने आगामी काळात लवकरच इंद्रायणीनगरमध्ये २०० बेडचे २ कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे आगरवाल यांनी सांगितले.























Join Our Whatsapp Group