पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब उद्योगनगरी, रोटरी क्लब पिंपरी आणि रोटरी क्लब डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या कोविड केंद्राला १०० बेडस सुपूर्द करण्यात आले. महापालिकेचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी यांच्याकडे बेडस सुपूर्त करण्यात आले.
यावेळी नियोजित प्रांतपाल डॉ. अनिल परमार, रोटरीच्या जिल्हा समन्वयक मंजू फडके, क्युअर प्रकल्पाचे प्रमुख नितीन ढमाले, रोटरी क्लब ऑफ़ उद्योग नगरीचे अध्यक्ष रमेश सातव, पिंपरी क्लबचे अध्यक्ष मेहुल परमार, डेक्कन जिमखाना क्लबचे अध्यक्ष ओमकार भडसावळे उपस्थित होते. यावेळी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या पंचम उपक्रमांतर्गत २ हजार बेडस शिरूर, लोणावळा, पनवेल, भिगवण, राजगुरूनगर या कोविड केंद्रास देणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ झाला. शिरीष पोरेड्डी म्हणाले कि, शासनाकडून अद्याप कोविड निधी उपलब्ध झालेला नाही. अशा वेळी सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. अशा सामाजिक संस्थांच्या सहकार्याने कोविड सेंटर उभारण्यात आले. या केंद्रात उत्तम व मोफत सुविधा पुरविण्यात येत आहे.
क्युअर प्रकल्पाचे प्रमुख नितीन ढमाले म्हणाले कि, “जगा आणि जगवा” या उक्तीप्रमाणे आपल्याला कार्य करावे लागणार आहे. या कार्यासाठी राजगुरूनगर क्लबचे अध्यक्ष राहुल वाळुंज, प्राधिकरण क्लबच्या अध्यक्षा अदिती जोशी, देहूरोड क्लबचे अध्यक्ष अतुल कामत, पिंपरी रोट्रॅक्ट क्लबच्या अध्यक्षा उन्नती खिंसवरा यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अध्यक्ष रमेश सातव तर आभार भडसावळे यांनी मानले.























Join Our Whatsapp Group