पिंपरी (Pclive7.com):- नगरसेविका मिनल यादव व शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या गणेशमूर्ती दान आणि विसर्जन रथाला गणेश भक्तांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यासाठी असंख्य भाविकांनी पुढाकार घेतल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले.
महापालिकेच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विसर्जन घाटावर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये चैतन्याचे रूप घेऊन विराजमान झालेल्या गणरायाचे विसर्जन कसे करावे, यावरून नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर विशाल यादव यांनी सुरू केलेल्या उपक्रमामध्ये भाविकांनी उत्स्फूर्तपणे मूर्तिदान व विसर्जन रथामध्ये विसर्जन केले. त्यामुळे पर्यावरण पूरक उत्सवाचे बीज रुजल्याचे चित्र दिसून आले.
विशाल यादव यांनी सुरू केलेल्या या रथाचे प्रभागातील महिला आणि गणेश भक्तांनी स्वागत केले. तसेच अनेकांनी विसर्जन रथामध्ये आपल्या बाप्पाचे विसर्जन केले.























Join Our Whatsapp Group