पिंपरी (Pclive7.com):- ग्लोबल व्हिजन फाऊंडेशन तर्फे ग्लोबल आय इन्स्टिटयूट, पिंपळे सौदागर व नित्यसेवा हॉस्पिटल, सांगवी येथे नेत्रदान पंधरवड्या निमित्त नेत्रदानाची शपथ घ्या व मोफत नेत्र तपासणी करा या आगळ्या वेगळ्या शिबिरास पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पंधरा दिवसात जवळपास ४४५ नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प घेऊन आपली मोफत नेत्रतपासणी करून घेतली. शिबिरास मिळालेला प्रतिसाद पाहून ग्लोबल व्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष नेत्र तज्ञ डॉ.बबन डोळस यांनी ८ ऑक्टोबर पर्यंत हे शिबीर चालू ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.
येत्या ८ ऑक्टोबर रोजी जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पिंपळे सौदागर येथील ग्लोबल आय इन्स्टिटयूट मध्ये रोज सकाळी १० ते १२ दरम्यान मोफत नेत्र तपासणी चालू राहणार आहे.
तरी पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांनी 02027402080 या नंबर वर संपर्क साधून पूर्व नाव नोंदणी करून मोफत नेत्र तपासणीचा लाभ घ्यावा व नेत्रदान संकल्प करून या पवित्र कार्यास हातभार लावावा असे आवाहन नेत्रतज्ञ डॉ.बबन डोळस यांनी केले.