पिंपरी (Pclive7.com):- उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आभार मानले आहेत.
आग्रा येथे उभारण्यात येणाऱ्या मुघल म्युझियमला आता छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम म्हणून संबोधले जाणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. सोमवारी (दि.१४) आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आग्रा विभागातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी आग्र्यातील निर्माणाधीन म्युझियमबाबत माहिती घेण्यात आली.
याबाबत आदित्यनाथ म्हणाले की, आपके नए उत्तरप्रदेश में गुलामी की मानसिकता के प्रतिक चिन्हों का कोई स्थान नहीं! हम सबके नायक शिवाजी महाराज हैं!
यावर भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उत्तरप्रदेशमध्ये म्यूझियम उभारले जात आहे, ही आम्हा तमाम महाराष्ट्रीय बांधवांसाठी अभिमानाची बाब आहे.
























Join Our Whatsapp Group