पिंपरी (Pclive7.com):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रहाटणी – पिंपळे सौदागरमधील सफाई कर्मचारी तसेच आरोग्य कर्मचार्यांना सॅनिटायझर, मास्क आणि हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात आले. नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे व नगरसेवक श्री.शत्रुघ्न बापु काटे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड शहर भाजपाच्या वतीने ‘सेवा सप्ताह २०२०’ राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे व नगरसेवक श्री.शत्रुघ्न बापु काटे यांच्या वतीने रहाटणी-पिंपळे सौदागर येथील सफ़ाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी वर्गाला सॅनिटायझर, कापडी मास्क व हॅंन्ड ग्लोजचे वाटप करण्यात आले.
यावेळी पवना सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन श्री. जयनाथ काटे, नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे, नगरसेवक श्री.शत्रुघ्न काटे, कुंदाताई भिसे (अध्यक्ष:उन्नती फाऊंडेशन) श्री.संजय आबा भिसे (व्हा.चे.यशदा ग्रुप), श्री.दिपक नागरगोज व आरोग्य विभागाचे अधिकारी श्री. सौदाई उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group