पिंपरी (Pclive7.com):- गाडीमध्ये फिरून आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २४ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरीगावातील साई आंगन हाॅटेल समोर आज (दि.२६) पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली.
लालचंद देविदास शर्मा (वय ४९, रा. सुखवानी एम्पायर, पिंपरी) व चेतन जयरामदास कोटवाणी (वय ५०, संजय लायब्ररी जवळ, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हे कारमध्ये फिरून क्रिकेट मॅचवर (आयपीएल) बेकायदेशीरपणेरित्या सट्टा घेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टिम तयार करून पिंपरी येथील साई आंगन हाॅटेल समोर छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याजवळून चार मोबाईल, एक नोटबुक, दोन पेन, एक कॅल्क्युलेटर, एक इनोव्हा गाडी व रोख रक्कम ५ हजार ८५० रुपये असा एकूण २४ लाख २७ हजार ९५० रुपयांचा मुद्दमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१ सुधीर हिरेमट, सहायक पोलीस आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, पोलीस उप निरीक्षक सचिन सुर्यवंशी, पोलीस हवालदार खणसे, काकडे, पोलीस नाईक हांडे, पोलीस शिपाई भारती, धायगुडे, बंड, सोनवणे, जाधव, काडे यांनी मिळुन केली आहे.
या आरोपी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



















Join Our Whatsapp Group