पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ‘क’ व ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गुरूवार दि.१५ ऑक्टोबर रोजी महापालिके मार्फत होणारा सकाळ नंतरच्या पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
महापालिकेने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, ‘क’ व ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीचे काम गुरूवार दि.१५ रोजी करण्यात येणार आहे. दि.१५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतचा पाणीपुरवठा करणेत येईल. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे ‘क’ व ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत WD4 (भागश: मोशी, डुडुळगाव ,च-होली, वडमुखवाडी इ.) इंद्रायणीनगर, भोसरी, संततुकाराम नगर दिघी मॅगझीन या टाक्यांवरून होणारा पाणीपुरवठा बंद राहील.
दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवलेमुळे वर नमुद टाक्यांवरून होणा-या भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि.१६ रोजी होणारा पाणीपुरवठा अनियमित कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group