आदमापुर (Pclive7.com):- आदमापुर ता.भुदरगड येथील दै.पुढारीचे एंजट तानाजी जो. पाटील (बिनधास्त) यांनी आपण कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य आजारातुन मुक्त झाल्याबद्दल बाळु मामा कोवीड काळजी केंद्रामध्ये दिवसरात्र सेवा करणारे डॉक्टर, नर्स, पोलीस, सेवक यांचा यथोचित सत्कार केला.
डाॅक्टरांना, पोलीस व सेवकांना मानाचा फेटा, सोळा नर्सेना साडीचोळी देऊन केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कोराना सेंटर मधून बाहेर पडताना वृक्षारोपण केले. ज्या कोरोना सेंटर मध्ये उपचार झाले त्या बाळुमामा देवस्थानला दहा हजारांची देणगी पावती कुटुंबियांनी केली. कोवीड सेंटरच्या महादरवाजा समोर गो कोरोना अशी रांगोळी रेखाटली होती. तानाजी पाटील यांनी यांनी राबवलेल्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होती.
स्वतः तानाजी, त्याची पत्नी कांचन व आई हौसाबाई या तिघांना कोरोना ची लागण झाली होती. उपचारासाठी बाळु मामा कोविड काळजी केंद्रात त्यांना ठेवण्यात आले होते. केंद्रातील कोरोना योध्दे डॉक्टर, नर्स, सेवक, पोलीस हे आपली सेवा प्रामाणिक बजावत होते. त्यांनी केलेल्या सेवेमुळे अनेक कोरोना ग्रस्त बरे झाले होते. यामुळे धनाजी पाटील या त्याच्या भावाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी त्यांनी कोविड सेंटर मध्ये अॅडमिट असणाऱ्या इतर पेशंटना पण स्वतः जाऊन फुले देऊन कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आपण निस्वार्थ पणे केलेल्या सेवेमुळे आपला सत्कार झाला हे पाहून कोरोना योध्दे भारावुन गेले.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. भगवान डवरी, डॉ. गौरव महंत, डॉ. मनिषा डवरी, डॉ. प्रशांत डवरी, डॉ. विनायक कामत, वैद्यकीय अधिकारी सुशांत सुतार, फार्मासिस्ट योगेश भाट, पी.के. खोत, डेटा एंट्री ऑपरेटर, कक्षसेवक सुमित वास्कर, शाहीम पठाण, स्वप्नील वारके, इंद्रजित पाटील, ऋतुराज भाट, पोलीस पाटील माधुरी लक्ष्मण पाटील, तलाठी धनाजी पाटील, ग्रामसेवक डी.बी. माने, डॉ. संताजी भोसले पोलीस कर्मचारी दत्तात्रय शिंदे, मनोज पाटील, सुरज माने, श्री सद्गुरू बाळूमामा देवस्थानचे आनंदा लोंढे, गणेश खेबुडे, आरोग्य सेवक सागर नाईक, एच.बी. मुजावर, श्रीरंग पाटील, मारुती पाटील, कबिर पाटील, शिवम पाटील, सिस्टर प्रियांका पाटील, मेघा पाटील, पल्लवी पाटील, शितल पाटील, बेबीताई पाटील, मंजुळा, पल्लवी, सुशमा, प्रियांका, गितांजली कांबळे, स्वाती गायकवाड, जयश्री चौगले, आस्मिता वायदंडे, वृशाली नाईक, आश्विनी आसबे अनिता वारके आदि उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group