पुणे (Pclive7.com):- मानवहीत लोकशाही पक्ष पुणे यांच्या वतीने पोलीस डॉक्टर सफाई कर्मचारी रुग्णवाहिका ड्रायव्हर सुरक्षा रक्षक वायर मन सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीमाई साठे तर प्रमुख उपस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे नातु तथा मानवहीत लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे, राष्ट्रीय सचिव गणेशभाऊ भगत, प्रदेश अध्यक्ष राधाकृष्ण साठे, युवक प्रदेश अध्यक्ष भागवत वाघमारे तसेच पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राजु धुरंधरे आदीची उपस्थिती होती.
गेल्या सहा-सात महिन्यांपासून पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी दिवस-रात्र परिश्रम घेऊन आपले कर्तव्य निभावत आहेत. अश्या कोविड योध्याचा मान सन्मान झालाच पाहिजे. स्वतःची जीवाची परवा न करता हजारो लोकांचे प्राण वाचवले असे पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांचे आभार मानावे तितकेच कमी आहे. त्याच्या कामाची पोच पावती म्हणुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीमाई साठे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आयोजक मानवहीत लोकशाही पक्षाचे पुणे जिल्हा निरीक्षक विकास गवळी, जिल्हा अध्यक्ष बाबर खाडे, सोशल मीडिया नेटवर्कचे देवा भालके, आकाश घोलप, आकाश वाडेकर, ग्यानोबा नवघरे व पिंपरी चिंचवडमधील पदाधिकारी उपस्थित होते.