पिंपरी (Pclive7.com):- हिंदुत्वनिष्ठ असलेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा विचार करावा. देवालये भक्तांसाठी खुली करावीत व सरकारला जाग यावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात या अनुषंगाने २४ ऑक्टोबर रोजी राज्यभरात घंटानाद, शंखनाद करत भजन व आरती करून “ढोल वाजावा, महाराष्ट्र सरकार जागवा” असे आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचडमध्ये ही मोरया गोसावी मंदिर समोर आंदोलन घेण्यात आले.
या आंदोलनात विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री, विजयराव देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, अशोक यलमार, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मातृशक्ती पालक, नंदकुमार कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष शरदराव इनामदार, बजरंग दल पिंपरी-चिंचवड जिल्हा संयोजक नाना सावंत, सहसंयोजक अभिजीत शिंदे, संभाजी बालघरे, सागर चव्हाण, जिल्हा गोरक्षा प्रमुख मंगेश नढे, साप्ताहिक मिलन प्रमुख कृष्णा वाघमारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या आंदोलनाने सरकारला जाग आली नाही अथवा मंदिरांचे बंद दरवाजे उघडण्यात आले नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री विजयराव देशपांडे यांनी दिला आहे.
विश्व हिंदु परिषद बजरंग दल श्री क्षेत्र देहूगाव च्या वतीने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर समोर ही असे आंदोलन करण्यात आले. या वेळी संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिवाजी महाराज मोरे, विठ्ठल महाराज मोरे, रामनाना मोरे, चिंचवड विभाग बजरंग दल संयोजक संदेश भेगडे, निखिल पिंजण, ओमकार काळोखे, अमित मोरे, अशोक साकोरे, अमित भेगडे, अजित काळोखे, शिरीष मोरे, मुकेश पाठक, दिपक अग्रवाल, मयुर हिंगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
विश्व हिंदु परिषद बजरंग दल तळेगाव दाभाडे प्रखंडच्या वतीने तळेगाव येथील मारुती चौकामधील श्री मारुती मंदिर समोर ही आंदोलन करण्यात आले. यावेळी विश्व हिंदु परीषद बजरंग दल तळेगाव प्रखंडचे संयोजक ओंकार भेगडे, तळेगाव प्रखंड मंत्री, कपिल देवाडिगा रा. स्व. संघाचे मावळ तालुका संघचालक शशिकांत कदम, रा. स्व. संघाचे पुणे जिल्हा कार्यवाह अविनाश भेगडे, मयुर रेडे, प्रणव दाभाडे, प्रशांत भेगडे, कुणाल जव्हेरी, हर्षद सांडभोर, प्रतिक भेगडे, आकाश ठोंबरे समवेत विश्व हिंदु परीषद बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर, आंबेगाव व श्री रोकडोबा मारुती मंदिर जुन्नर शहर येथे ही आंदोलनं करण्यात आले.
आगामी काळात महाराष्ट्र सरकारने बंद मंदिराचे दरवाजे न उघडल्यास अखंड महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्या आंदोलनाच्या होणाऱ्या परिणामाला महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असे विहिंपने ठणकावले आहे.
भक्तांच्या दर्शनासाठी मंदिरे उघडण्यात यावेत यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला असून कोरोना महामारी आपदाच्या काळात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आठ महिने बंद असलेली मंदिरे भक्तांना दर्शनासाठी तातडीने उघडावीत नाहीतर विश्व हिंदू परिषद तीव्र आंदोलन करेल असा इशारा परिषदेचे केंद्रीय मंत्री शंकरजी गायकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिला होता.






















Join Our Whatsapp Group