पिंपरी (Pclive7.com):- विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ पूर्णवेळ कार्यकर्ते भुजंगराव घुगे यांना विहिंप पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ पूर्णवेळ कार्यकर्ते भुजंगराव वामन घुगे अणदूरचे राहणारे गेले ३८ वर्ष न थकता न थांबता, प्रकृतीचा व मनाचा न विचार करता अखंडपणे सेवा करत होते. भुजंगराव घुगे यांचे वयाच्या ६२ वर्षी लखनऊ येथे रविवारी दि. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कोरोना आजाराने निधन झाले.
स्वर्गीय भुजंगराव घुगे यांना पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विहिंप मुंबई क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊरावजी कुदळे, विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत विजयराव देशपांडे, प्रांत महिला विभाग पालक, नंदकुमार कुलकर्णी, विहिप जिल्हाध्यक्ष शरदराव इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजीराव शिंदे, मुकुंद चव्हाण, महादेव साळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भुजंगराव घुगे यांच्या जाण्याने विश्व हिंदू परिषदेचे व संघाचे कधीही न भरून निघणार नाही अशी खूप मोठी हानी झाली आहे. मन मिळावू, सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघ परिवाराचे कार्य तेवत ठेवणारे यांच्या जाण्याने समस्त घुगे परिवार व विश्व हिंदू परिषदेवर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याचे बळ मिळो व भुजंगराव घुगे यांनी ईश्वर चरणी सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अशी प्रार्थना विहिंप मुम्बई क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊरावजी कुदळे व पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री, विजयराव देशपांडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना केली.






















Join Our Whatsapp Group