पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरवमधील महिलेला कचऱ्यातून सोन्या चांदीचे दागिणे असलेली पिशवी शोधून देत प्रामाणिकतेचे दर्शन घडविणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा पिंपरी युवासेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
दोन दिवसापूर्वी पिंपळे गुरव मधील एका महिलेची पिशवी घंटागाडीमध्ये टाकून देण्यात आली होती. त्या पिशवीमध्ये सोन्या व चांदीचे दागिने होते. ही गोष्ट एकाने आरोग्य कर्मचारी हेमंत लखन यांना सांगितली. त्यांनी मोशी कचरा यार्ड मध्ये शोधून ती पिशवी त्या महिलेला दिली. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्या महिलेला त्यांच्या सोन्या-चांदीच्या वस्तू पुन्हा भेटल्या.
यावेळेस नगरसेवक राजू बनसोडे, युवासेना विभागसंघटक निलेश हाके, आरोग्य अधिकारी भोसले साहेब, अजय जाधव, आनंद कांबळे, मोसीन शेख, सुरज शिंगोटे उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group