पिंपरी (Pclive7.com):- बिहार विधानसभा निवडणूकीत भाजपा + जेडीयू आघाडीची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे सुरु असून जवळ-जवळ भाजपा + जेडीयू आघाडीचा विजय स्पष्ट झाला आहे. बिहार विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टी सर्वात जास्त जागा निवडून आल्यामुळे भाजप क्रमांक एकचा पक्ष म्हणून पुढे आला आहे.
शहराच्या वतीनेही पक्ष कार्यालयात हा विजय साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांना विजयी पेढा भरवून बिहार निवडणूकीत पक्षाचा विजय साजरा केला.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, सरचिटणीस विजय फुगे, शहर उपाध्यक्ष नंदकुमार दाभाडे, भाजयमोचे उपाध्यक्ष जवाहर ढोरे, अंकुशराव लोंढे, धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, संजय परळीकर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखिल बिहार विजयाचा आनंद साजरा केला.
पुन्हा एकदा विकासपुरुष मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जनतेने भाजपाच्या पारड्यात आपला कौल दिला आहे असे प्रतिपादन शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केले.