पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव येथील रविदादा भिलारे सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळातील आणखी एक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. ज्यामध्ये कोरोना महामारीमुळे वंचित राहिलेला दुर्बल, दुर्लक्षित गरीब वर्गासोबत फटाके मुक्त पर्यावरण पुरक दिवाळी साजरी करत या वर्गाला नविन कपडे, मिठाई, रोशनाईसाठी पणत्या वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आली.
सामजिक कार्यकर्ते रवी भिलारे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वी पार पडला.
यावेळी वंचित वर्गाच्या नागरिकांच्या डोळ्यातील समाधान, प्रेम, माया, सहानुभूती पाहुण स्वत: रवि भिलारे यांचे अश्रु अनावर झाले. पण समाजासाठी आपण काही देणं लागतो या निश्चयाने पुढे अजून आव्हाने स्वीकारत जनसामान्यांच्या हिताचे उपक्रम राबवुन समाजाने दिलेली जबाबदारी चोख पणे पार पाडत घेतलेला समाजसेवेचा वसा असाच सुरु ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.






















Join Our Whatsapp Group