आळंदी (Pclive7.com):- संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी ते छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूरला जोडणारा रस्ता म्हणजे आळंदी – मरकळ रोडवर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्यात खडे कि खड्यात रस्ते हेच वाहने चालविणाऱ्या नागरिकांना समजत नाही. या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अन्यथा मनसे स्टाईलनी आंदोलन करण्यात येईल असे मनसेचे रस्ता साधन सुविधा आणि आस्थापणा विभागाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश लोखंडे यांनी पुणे जिल्हा बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
यावेळी अभय वाडेकर, प्रसाद बोराटे, निलेश घुंडरे, बाळू नेटके, किरण नरके आणि युवराज चौधरी उपस्थित होते.
आळंदी मरकळ रोड वर छोटे मोठे औद्योगिक कंपन्या आहेत. त्यामुळे या रोडवर माल वाहतूक करणाऱ्या गाड्या, कामगार, शेतकरी, भाविक वर्ग मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात. रस्त्यावरील खड्याचा अंदाज न आल्याने या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत असतात. काहींना तर अपघातात जीव गमवावा लागला आहे. तर काही नागरिकांना अपंगत्व सुद्धा आले आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर चांगल्या प्रतीचे डांबरीकरण करून पूर्ण करावा अशी मागणी अविनाश लोखंडे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group