मुळशी (Pclive7.com):- जांभे येथील श्री गुरुदेव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी अविनाश गायकवाड तसेच व्हाईस चेअरमनपदी मंगेश कानपिळे यांची बिनविरोध निवड झाली. पौड येथे सहाय्यक निबंधक तथा अपिलीय अधिकारी अरुण साकोरे यांनी हि निवड जाहीर केली.
यावेळी पिडीशी बँकेचे माजी चेअरमन व श्री गुरुदेव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे विद्यमान संचालक आत्माराम नाना कलाटे, मुळशी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बबनराव साखरे, सेक्रेटरी दत्तात्रय जाधव यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी दुय्यम निबंधक यांनी एक वर्षासाठी अकरा जणांचे संचालक मंडळ बिनविरोध घोषित केले. यामध्ये काळुराम गायकवाड, गोकुळ वाघिरे, बबनराव गायकवाड, मारूती गायकवाड, सोपान पवार, शरद निकाळजे, संभाजी गायकवाड, पोलीस पाटील ओंकार गायकवाड, शकुंतला गायकवाड, सुमनताई मगर यांचा समावेश आहे.
नवनिर्वाचित चेअरमन अविनाश गायकवाड हे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्षपदी आहेत. त्यांचा शहरासह ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आहे. तसेच मोठ मोठ्या राजकीय नेते मंडळीसोबत राहून काम केल्याने त्यांच्याकडे कमी वयात अनुभवाचे मोठे गाठोडे आहे. त्यामुळे या अनुभवाच्या जोरावर ते या पदाला योग्य ज्ञाय देतील असा विश्वास संचालक मंडळ व शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.



















Join Our Whatsapp Group