पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता बांधकाम केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुहास ज्ञानदेव इंगवले (रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत महापालिकेचे उपअभियंता हेमंत प्रभाकर देसाई यांनी शनिवारी (दि. २८) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंगवले यांनी तापकीरनगर, मोशी येथे महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी न घेता बांधकाम केले. त्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.






















Join Our Whatsapp Group