आकुर्डी (Pclive7.com):- जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून मानव सेवेसाठी समाजसेवकांनी केलेल्या कार्याबद्दल मानव संसाधन विकास संस्थेच्या वतीने समाजभूषण व मानवरत्न पुरस्काराचे वितरण आकुर्डी येथे करण्यात आले. समाज भूषण पुरस्कार डॉ.राजेंद्र खेडेकर, पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, ॲड.प्रसाद सांगळे, विजयराव भिसे, सायली गुजर, शंकर नाणेकर, श्रीमती. सगाई नायर, राजकुमार शेळके, डॉ. अशोक लोंढा यांना समाजभूषण पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
तर संतोष बागुल, गोपाळराव गायकवाड, नरेश आनंद, श्रीमती रिबेका शिंदे यांना मानवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदरच्या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हाळसकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष बसप्पा कोळी, सचिव सुनील उबाळे, कायदेतज्ञ दिलीप देहरकर, महाराष्ट्र राज्य महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा नलिनी शिंदे, महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरीक विभागाचे अध्यक्ष गोपाळराव गायकवाड, उपाध्यक्ष यतीन पालकर , प्रदेश उपाध्यक्ष मंगलसिंग कटारिया, प्रदेश सचिव नरेश आनंद, ज्येष्ठ नागरीक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हरीश्चंद्र गायकवाड अधिकारी, पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हाळसकर म्हणाले कि, “मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. मानवी हक्क हि संकल्पना समजून घेण्यापूर्वी मानवी हक्क म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाला जन्मताच मिळणारे अधिकार म्हणून मानवी हक्काची ओळख आहे. निसर्गतच जे अधिकार प्रत्येक जिवंत व्यक्तीला असतात त्याला मानवी हक्क असे म्हणतात.
१० डिसेंबर १९४८ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या साधारण सभेने मानवी अधिकाराचा जागतिक जाहीरनामा संमत करून उदघोषित केल्यामुळे १० डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे मानव सेवेसाठी समाजातील समाजसेवकांनी केलेल्या सेवांबाबत त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group