पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश अध्यक्षावर औरंगाबाद येथे अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने या प्रवृत्तीच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चाच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रकार रोखण्यात या सरकारला सपशेल अपयश आले आहे. याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज आंदोलन केले. भाजयुमोचे शहर जिल्हा अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
नुकतेच संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष यांच्यावर नौकरीचे आमीष दाखवुन एका युवतीवर अज्ञात स्थळी नेऊन गाडीमध्ये अत्याचार व बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यावर राज्य सरकारने व पोलिसांनी त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. जर कारवाई करून अटक नाही झाली तर युवा मोर्चातर्फे यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी दिला.
यावेळी युवा मोर्चा युवती आघाडीतील प्रदेश युवती सहसंयोजिका वैशाली खाडे, सदस्य देवयानी भिंगारकर, सरचिटणीस तेजस्विनी कदम, चिटणीस मुक्ता गोसावी, पूजा आल्हाट, अंजली पांडे, सायली शहाणे, स्मिता रासकर, प्रियांका जाधव, चंद्रशीला बनसोडे, नयन पालवे, शुभांगी कसबे यांनी निषेध नोंदवला.
तसेच, प्रदेश सदस्य अजित कुलथे, सरचिटणीस दिनेश यादव, जवाहर ढोरे, दिपक नागरगोजे, गणेश जवळकर, उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे, शिवराज लांडगे, मोहित बुलाणी, रामदास कुटे, जयदिप कर्पे, अतुल बोराटे, आदित्य कुलकर्णी, चिटणीस रवि जांभुळकर, प्रकाश चौधरी, मंगेश धाडगे, मंडल अध्यक्ष सन्नी बारणे, शिरीश जेधे, व्यापारी आघाडी संयोजक राजेश राजपुरोहित, क्रिडा संयोजक विवेक महाजन, सहसंयोजक प्रथमेश सकपाळ, सोशल मीडीया संयोजक विक्रांत गंगावणे, विद्यार्थी आघाडी सहसंयोजक अनिकेत शेलार, वरद जोशी, तेजस मुळे, रूबेन सन्नी, सिद्धांत बिंगानीया आदींचा आंदोलनात सहभाग होता.























Join Our Whatsapp Group