चिखली-मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनचा पुढाकार
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळा
पिंपरी (Pclive7.com):- कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य अन् सुरक्षिततेसाठी लढणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील कोरोना योद्धांचा प्रातिनिधिक स्वरुपात गौरव केला जाणार आहे. ‘अनसंग वॉरिअर्स, प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड’ या पुरस्कारांचे वितरण चिखली- मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या पुढाकार केले जाईल, अशी माहिती फेडरेशनचे संजीवन सांगळे यांनी दिली.
भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात शनिवारी, दि. २ जानेवारी २०२१ रोजी सांयकाळी ५ वाजता हा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा होईल. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे २० हजार नागरिकांनी कोरोना योद्धे म्हणून प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे काम केले आहे. प्रशासकीय सूचना आणि नियामांचे पालन करीत या सर्व लोकांचा सन्मान- गौरव करणे शक्य नाही. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरुपात केवळ २५ कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संजीवन सांगळे यांनी दिली.
याबद्दल फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले की, कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढणाऱ्या आणि आपल्या शहराला सुरक्षित ठेवणाऱ्या सर्व कोरोना योद्धांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतून पिंपरी-चिंचवड शहर तसेच चिखली-मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशन आणि अविरत श्रमदान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘अनसंग वॉरिअर्स, प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड’ या पुरस्काराचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात येणार आहे.
हे आहेत ‘अनसंग वारिअर’ पुरस्काराचे मानकरी
१) मा. श्री. एम. ए. हुसेन, रियल लाईफ, रियल पीपल
२) थेरगाव सोशल फाउंडेशन (अनिकेत प्रभू)
३) मा. श्री. डॉ. विनायक पाटील, वैद्यकीय अधिकारी, वायसीएम हॉस्पिटल
४) मा. श्री. डॉ. शंकर मोसलगी, रक्त संक्रमण अधिकारी, वायसीएम रक्तपेढी
५) सहगामी फाउंंडेशन (प्राजक्ता रुद्रावार)
६) मा. श्री. मंगेश चितळे, पिं. चिं. मनपा भांडार विभागप्रमुख
७) सौ. सोनू गिरधारी खंडारे
८) मा. श्री. जसविंदरसिंग सोखी, आकुर्डी गुरुद्वारा प्रमुख
९) मा. श्री. रमेश सातव, अध्यक्ष, रोटरी क्लब, उद्योगनगरी
१०) कै. पांडुरंग रायकर, पत्रकार (मरणोत्तर)
११) नर्सेस ग्रुप, वायसीएम हॉस्पिटल
१२) संस्कार प्रतिष्ठान (मोहन गायकवाड)
१३) मा. श्री. विनायक वर्पे, पोलीस नाईक, भोसरी
१४) मा. श्री. के. सी. गर्ग, सचिव, पिंपरी-चिंचवड को-ऑप. हाऊसिंग सोसायटी फेडरेशन
१५) मा. श्री. मिलिंद माळी, वॉर्डबॉय
१६) मा. श्री. मारुती जाधव, अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर
१७) केसर व्हॅली सोसायटी, चिखली
१८) मा. श्री. योगेश सेठीया, संदेश गॅस कंपनी
१९) मा. श्री. नागेश वाघमारे, शवविच्छेदन विभाग, मनपा हॉस्पिटल
२०) लघुउद्योग भारती संस्था, पिंपरी चिंचवड शाखा (दीपक फल्ले)
२१) मा. श्री. गिरीश प्रभुणे, अध्यक्ष, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्
२२) मा. श्री. बबन पवार, सफाई कर्मचारी, मनपा रुग्णालय, भोसरी
२३) स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (प्रदीप पाटील)
२४) मा. श्री. डॉ. अभयचंद्र दादेवार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वायसीएम हॉस्पिटल
२५) कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचलित पोलीस व नागरिक मित्र संघटना (अशोक तनपुरे)






















Join Our Whatsapp Group