पिंपरी (Pclive7.com):- माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी येथील पवनेश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या सौ. दिपिकाताई संदीप कापसे यांच्या संकल्पनेतून नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याविषयी अधिक माहिती देताना दिपिका कापसे म्हणाल्या की, कोरोना आजाराच्या प्रादुर्भावाने रक्तपेढ्यांमध्ये असलेला रक्तसाठा कमी झाला आहे. त्यामुळेच आज य बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण १६२ रक्तदात्यांनी शिबिरामध्ये सहभाग नोंदवला.
तसेच कोरोना काळामध्ये स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे रुग्णासेवा देणार्या जिजामाता रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच परिसरातील लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम मंदिरामध्ये घेण्यात आला होता. सदर कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते किसनराव कापसे, संदीप कापसे, विशाल कापसे, संतोष कापसे, योगेश नलावडे, विकास कापसे, संदीप वाकडकर, शहाजी तळेकर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरास पै.संदीप कापसे, समर्थ हनुमान मित्र मंडळ, क्रांती क्रिकेट संघ, यांचे सहकार्य लाभले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी सूरज कापसे, सचिन शिंदे, विवेक कापसे, मल्हारी साकार, सार्थक कल्हापुरे, राकेश कापसे, सिद्धेश कापसे, मृणाल शिंदे, प्रथमेश कापसे, कुणाल कापसे, करण कापसे, सिद्धार्थ गायकवाड यांनी परिश्रम घेतले.






















Join Our Whatsapp Group