पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना, युवासेना, युवतीसेना, भारतीय विद्यार्थी सेना चिंचवड विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ११५ जणांनी रक्तदान केले.
वाल्हेकरवाडीतील चिंतामणी चौकात आज (दि.०२) हे शिबिर पार पडले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, युवासेना पुणे जिल्हा संघटक जितेंद्र ननावरे, पिंपरी विधानसभा महिला संघटिका सरिता साने, शिवसेना शहर संघटक (चिंचवड विधानसभा) हरेश नखाते, चिंचवड विधानसभा युवासेना अधिकारी विश्वजित बारणे, विभाग प्रमुख प्रदीप दळवी, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत माळी, युवासेना अधिकारी करण वाल्हेकर, वतन वाल्हेकर, रोहन शेटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरात शिवसेना, युवा सेना, युवती सेना, भारतीय विद्यार्थी सेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतले.
यावेळी एकूण ११५ पिशव्या रक्त संकलित झाल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.






















Join Our Whatsapp Group