पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड पोलीस ठाणे आवरातील वर्षानुवर्षे धुळ खात पडलेली बेवारस व विविध गुन्ह्यातील जप्त वाहने त्यांचे मुळ मालकांचा शोध घेवुन त्यांना परत देण्याचे आदेश पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्याअुषंगाने चिंचवड पोलीस स्टेशनच्या आवरातील अनेक वर्षे धुळ खात पडलेल्या दुचाकी वाहनांचे चासी नंबर व इंजीन नंबर वरुन एकुण ६५ वाहनांच्या मुळ मालकांचा शोध गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने पोलीसांनी लावला असून ती वाहने परत केली जाणार आहेत.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर, सहा.पोलीस आयुक्त सागर कवड यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलीस ठाण्याच्या आवारात मालकांच्या प्रतिक्षेत अनेक वर्षापासून बेवारस व विविध गुन्ह्यात जप्त असलेल्या ६५ वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) विश्वजीत खुळे व संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, शिवाजी जव्हेरी यांना यश आले आहे.
सदर शोध लागलेल्या वाहनांच्या मालकांनी आपली वाहने ओळख पटवुन व पुरावे देवुन, परत घेवुन जाण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. चिंचवड पोलीस स्टेशनच्या आवरात शोध लागलेल्या एकुण ६५ वाहनांचे नोंदणी क्रमांक, वाहनाचा प्रकार, चासी नंबर, इंजीन नंबर, वाहन मालकाचे नाव व पत्ता याची यादी पोलीस स्टेशन येथे लावण्यात आली आहेत. सदर यादी मध्ये आपले वाहन/नाव असल्यास अशा मालकांनी ओळख पटवुन, आपले वाहन घेवुन जावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यात शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात. मात्र न्यायालयीन प्रक्रीयेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने सदर वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षोनुवर्षे मालकांच्या प्रतिक्षेत धुळ खात पडुन आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याचा परिसर बकाल व विचीत्र दिसुन येतो. त्यामुळे पोलीस ठाणे सुशोभिकरणास बाधा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेवून चिंचवड पोलीस स्टेशनने बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने सदर शोध लागलेल्या एकुण ६५ मालकांशी संपर्क साधला जात आहे. शोध लागलेल्या वाहनांच्या मालकांनी त्यांची वाहने तात्काळ चिंचवड पोलीस स्टेशन येथुन वाहनाची कागदपत्रे, स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र दाखवुन घेवुन जावीत, सदरची वाहने घेवुन न गेल्यास, ती बेवारस समजुन, कायदेशीर प्रकीया पुर्ण करुन सदर वाहनांचा लवकरच लिलाव करण्यात येईल असे चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी सांगितले आहे.





















Join Our Whatsapp Group