बारामती (Pclive7.com):- ‘एक मराठा लाख मराठा’ या देशव्यापी सामाजिक संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण राष्ट्रीय नेते तथा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते गोविंद बाग बारामती या ठिकाणी संपन्न झाले.
राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी युवराज दाखले यांच्या कामाचे कौतुक करून आभिनंदन केले. ‘एक मराठा लाख मराठा’ या देशव्यापी संघटनेच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षपदी प्रतिक पवार व देशव्यापी अध्यक्षपदी विक्रांत पवार यांनी पदभार स्विकारला.
देशामधील अखंड बाराबलुतेदार समाज बांधवाची शैक्षणिक व आर्थिक प्रगती सुधारण्याकरिता सदैव कटिबद्द राहण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय लहुजी पँथर प्रदेश संघटक तथा एक मराठा लाख मराठा या देशव्यापी संघटनेचे राष्ट्रीय सदस्य युवराज दाखले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सरचिटणीस सचिन आण्णा लिमकर, संजय माने, सुनिल सोनवने, आकाश शेवाळे, श्री.गाडे, वेदांत जाधव, प्रा.काशिनाथ आल्लाट सर, रामदास तांबे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group