पुणे (Pclive7.com):- निवडणुकीत उमेदवार जिंकला की कार्यकर्ते त्याला खांद्यावर उचलताना आपण अनेकदा पाहिलं असेल. पण, पुणे जिल्ह्यातील पाळू ग्रामपंचायतीत पती निवडूण आल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी पत्नीने चक्क पतीलाच खांद्यावर घेत मिरवणूक काढली.
पुणे जिल्ह्यातील पाळू ग्रामपंचायतीमध्ये जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने ७ पैकी ६ जागावर वर्चस्व मिळवले. या घवघवीत यशामागे महिलांचा मोठा मोलाचा वाटा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवाराच्या पत्नीने आपल्या पतीच्या विजयायासाठी जल्लोष साजरा केला.
पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी २२१ मतं मिळवत विरोधी उमेदवारावर दणदणीत विजय मिळवला. पतीने इतकं मोठं यश मिळवल्याने पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी थेट पतीला खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक जिंकल्यावर जल्लोष करण्यास, गुलाल उधळण्यास, तसेच जास्त कार्यकर्त्यांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली होती. त्या कायद्याचं पालन करत आनंद साजरा करण्यासाठी स्वत: पतीराजांना खांद्यावर घेतलं आणि गावात त्यांची विजयी मिरवणूक काढली.





















Join Our Whatsapp Group