पिंपरी (Pclive7.com):- मोशी येथील सामाजिक कार्यकर्ता सुनील कदम यांची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पिंपरी चिंचवड शहराच्या उपशहर वाहतुक संघटक या पदी नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी दिले आहे.
मोशी येथे श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघटना (मोशी) यांचा नामफलकाचा उद्घाटन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, सुशांत साळवी अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पिं.चिं.शहर, बसप्पा बळसंग पुणे जिल्हा अध्यक्ष, पुणे शहराध्यक्ष किशोर चिंतामणी, भोसरी विधासनसभा मनसे अध्यक्ष अंकुश तापकीर, सचिव राहुल जाधव आदि मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अंतर्गत असलेल्या श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघटना (मोशी) अध्यपदी सुनिल रामलिंग कदम, पप्पु राजाराम गवारी उपाध्यक्ष, सचिन थोरवे खजिनदार, योगेश जाधव कार्याध्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा ही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.





















Join Our Whatsapp Group