पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील श्री.संदीप वाघेरे युवा मंच व रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरजू नागरिकांसाठी दि.२७ रोजी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, शहरातील गरजू रुग्णासाठी रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या सहकार्यातून जेष्ठ नागरिक संस्थेचे विरंगुळा केंद्रामध्ये मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे.
शिबिरा दरम्यान नागरिकांची रक्तदाब, ई. सी. जी., २ डी ईको, व अँजिओग्राफी तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही वाघेरे यांनी केले आहे.
शिबिराचे आयोजन युवा मंचचे अध्यक्ष हरिष वाघेरे, राजेंद्र वाघेरे, शुभम शिंदे, श्रीकांत वाघेरे, सामाजिक कार्यकर्त्या रंजना जाधव यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group