पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील दि सेवा विकास को ऑप बँक ली च्या अध्यक्षपदी अॅड. विजयकुमार रामचंदानी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संचालक मंडळाची सभा बुधवारी (दि.२७) बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. या सभेत अध्यक्षांची एकमताने निवड करण्यात आली.
शाहूराज हिरे (उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर ३) आणि सर्व संचालक यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली. तसेच बँकेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सीमा सूर्यवंशी देखील यावेळी उपस्थित होत्या.
अॅड. विजयकुमार रामचंदानी हे सन २०१५ पासून बँकेचे संचालक आहेत. ते वकीली, सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. अॅड. रामचंदानी हे बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास सर्व संचालक मंडळाने व्यक्त केला. सर्व संचालक मंडळाला बरोबर घेऊन ते बँकेची उत्तम प्रकारे धुरा सांभाळतील. बँकेला आर्थिक प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतील, असाही विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group