पुणे (Pclive7.com):- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन संजय साठे यांची राज्य शासनाच्या साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीवर निवड करण्यात आली.
शासनाच्या निर्णयानुसार साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे अनुवाद, संपादन, आणि प्रकाशनाची सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. या ग्रंथांना राज्यात, देशात व परदेशात मोठी मागणी असल्याने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संबंधित अप्रकाशित साहित्य, लेखन संशोधनाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी चरित्र साधने प्रकाशन समितीवर साठे यांची निवड करण्यात आली आहे, असे पत्र महाराष्ट्र शासनाचे उप सचिव द.रा. कहार यांनी दिले आहे.






















Join Our Whatsapp Group