मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्यतील साळुंब्रे गावातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याने पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक संकटात आले आहेत. यामुळे बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पोल्ट्री व्यावसायिकांसह खासदार शरद पवार यांची गुरुवारी (दि.२८) मुंबई येथे भेट घेतली.
बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मावळातील अनेक ठिकाणी बर्ड फ्ल्यू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कुकूटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सध्या तरी मावळातील कुकूटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना २०१३ च्या नियमानुसार आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाढलेल्या उत्पादन खर्च विचारात घेऊन मिळावी तसेच पक्षी नष्ट करण्याऐवजी त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात यावा, असे निवेदन आमदार शेळके यांनी खासदार पवार यांना दिले आहे.
या बैठकीस राज्याचे पशु संवर्धनमंत्री सुनील केदार, पशु संवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग, मावळ तालुका कुकूटपालन शेतकरी संघटनेचे सदस्य व इतर शेतकरी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group