पिंपरी चिंचवड शहर संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांची माहिती; राज्यभरात भाजपाचे कार्यकर्ते महावितरण कार्यालयांवर धडकणार
पिंपरी (Pclive7.com):- महावितरण प्रशासनाने राज्यातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे सुमारे ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करीत आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयाला टाळा ठोको आणि हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड भाजपाचे संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी गाव येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळ असलेल्या महावितरण कार्यालयावर उद्या, दि.५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता धडक देण्यात येणार आहे.
या आंदोलनासाठी भाजपाचे शहरातील सर्व प्रदेश पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, सर्व आघाड्या व मोर्चे यांचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुख यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा शहर संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group