पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पिंपळे सौदागर मास्टर शेफ-२०२१’ या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेविका निर्मला संजय कुटे यांच्या वतीने शनिवार दि.१३ व रविवार दि.१४ रोजी पिंपळे सौदागर येथील पृथ्वीराज मंगल कार्यालय येथे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी या स्पर्धेत सर्व महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन निर्मला कुटे यांनी केले आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकास मायक्रोवेव्ह ओव्हन, द्वितीय क्रमांकास मिक्सर तर तृतीय क्रमांकाला इलेक्ट्रिक गॅस शेगडी बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या नियम व अटी खालील प्रमाणे१) पाककला स्पर्धेसाठी नाष्ट्याचे पदार्थ बनवावा लागेल.२) नाष्ट्याचे पदार्थ आपल्या घरी बनवून शनिवार, दिनांक १३/०२/२०२१ रोजी सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत स्पर्धास्थळी सादर करावे.३) अंतिम फेरीसाठी १० स्पर्धकांची निवड करण्यात येईल. सदर स्पर्धकांना दिनांक १४/०२/२०२१ रोजी स्पर्धास्थळी १ पदार्थ बनवावा लागेल.
स्पर्धेत नाव नोंदणी दि.०८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत प्रथमेश जाधव – ९९२२५०१९३९, संकेत कुटे – ९८२३४९५३२९ यांच्याकडे करावी.






















Join Our Whatsapp Group