पुणे (Pclive7.com):- पुण्यात करोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. आज पुणे शहरात दिवसभरात ७४३ करोना बाधित रुग्ण आढळले. तीन करोना रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
३८२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मंगळवारी पुण्यात दिवसभरात ६६१ नवे करोनाबाधित आढळले, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला होता.
करोनामुळे पुण्यात आतापर्यंत ४ हजार ८३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच दरम्यान ३८२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत पुण्यात एक लाख ९१ हजार ३०० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.






















Join Our Whatsapp Group