पिंपरी (Pclive7.com):- महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. त्यानिमिताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यंदा ८ मार्च ते १५ मार्च यादरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे पिंपळे सौदागर येथील शिव शंभो सेवा मंडळ यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
महाशिवरात्री निमित्त भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येण्याची शक्यता असते. यामुळे गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शहरात कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे.
शहरातील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्य मनाई करणारा आदेश लागू केला आहे.
दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा प्रसार होत असल्याने राज्य शासनाच्या नियमाचे पालन करून यंदाची महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे.
यंदाचा सप्ताह सोहळा साजरा केला जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन शिव शंभो सेवा मंडळ पिंपळे सौदागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group