पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अवघ्या ५ महिन्याच्या कालावधीत घोळवे यांनी दिला राजीनामा आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतू वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला असल्याचे स्पष्टीकरण पक्षाच्यावतीने देण्यात आले आहे. दरम्यान स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीनंतर भाजपात राजकीय नाट्य सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे उपमहापौर केशव घोळवे यांनी अवघ्या पाच महिन्यात राजीनामा दिला आहे. घोळवे यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे आज (दि.०५) उपमहापौर पदाचा राजीनामा दिला असून महापौरांनी तो मंजूर करत आयुक्तांकडे पाठविला आहे. दरम्यान, उपमहापौरपदासाठी वसंत बोराटे यांचे नाव निश्चित असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group