पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाला, परंतु समाजासाठी अत्यंत आवश्यक असणारे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळासाठी कोणतीही घोषणा केली नाही. शिवाय आण्णा भाऊ साठे यांच्या जयंत्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यासाठी ही तरतूद केली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाचा मी जाहीर निषेध करतो, कारण यामध्ये मातंग समाजाला जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी केला आहे.
मातंग समाजासाठी कोणतीही तरतूद नाही, मातंग समाजामध्ये अस्वस्थता आहे. समाजाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी अर्थपुरवठा करणारे महामंडळ दुर्लक्षित ठेवले आहे. तसेच पुण्यातील संगमवाडी येथील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी ही अजिबात तरतूद केली नाही. तसेच मुंबई येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे चिरानगर येथील राष्ट्रीय स्मारकासाठी ही तरतूद नाही.
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाबाबत ही धोरण जाहीर केले नाही. त्यामुळे या जातीयवादी मानसिकता असणाऱ्या सरकारचा संपूर्ण महाराष्ट्र भर आम्ही निषेध करणार असल्याचे अमित गोरखे यांनी जाहीर केले आहे.





















Join Our Whatsapp Group