पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील उद्योगपती व माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दि सेवा विकास को-ऑप बँकेतील कथित घोटाळा प्रकरणी पोलिसांनी रविवारी (दि.०७) रात्री त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी बाजार पेठेतील व्यापाऱ्यांची बँक म्हणून सेवा विकास बँक प्रसिद्ध आहे. या बँकेचे अमर मूलचंदानी अध्यक्ष होते. त्यांनी २०१० ते २०१९ पर्यंत २३८ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या गुन्ह्याप्रकरणी मूलचंदानी यांना रविवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले केली.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, ४२० आणि इतर अतिरिक्त कलमाअंतर्गत मूलचंदानी यांना २०१९ च्या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पण, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यामुळे त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये तात्पुरता स्वरुपात एमसीआरमध्ये ठेवण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group