पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी पुन्हा वाढताना दिसत आहे. आज (दि.११) शहरात दिवसभरात ८१२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आजपर्यंतच्या रूग्णांची संख्या १११५१५ एवढी झाली आहे. दरम्यान ५ रुग्णांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज ३७३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देत घरी सोडण्यात आले आहे. काल मंगळवारी (दि.१०) दिवसभरात ६३३ नवे कोरोनाबाधित आढळले होते, तर एका रुग्णांचा मृत्यू झाला होता.
कोरोनामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत १ लाख ११ हजार ५१५ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. तर २ हजार ६५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ३ हजार ८९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान आज शहरातील रूग्णालयात ५ हजार ७५९ कोरोना बाधित रूग्ण आहेत. त्यातील १२८१ जणांवर रूग्णालयात उपचार सुरू असून उर्ववित ४४७८ सक्रीय रूग्ण होम क्वारंटाईन आहेत.






















Join Our Whatsapp Group