पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मधील आण्णासाहेब मगर महविद्यालय येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे कोविड लसीकरण मोहिमेची सुरूवात आज (दि.१८) करण्यात आली.
माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितलताई काटे यांच्या उपस्थितीत या लसीकरण मोहिमेची सुरूवात करण्यात आली.
यावेळी ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक व दिर्घ आजार असलेल्या ४५ वर्षा पुढील नागरिकांनी सुध्दा लस घेण्याचे आवाहन नाना काटे व शितल काटे यांनी केले आहे.
याप्रसंगी डॉ. श्रीमती संगीता तिरूमणी, डॉ. प्रफुल्ल तपशाळकर, हभप माऊली हांडे, संपत मेटे, ज्ञानेश्वर काटे, अर्जुन काटे, रामदास माखीजा, पुनम कोलते, तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group