पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातून वाहणार्या पवना आणि इंद्रायणी नद्यांना सध्या जलपर्णींने विळखा घातला आहे. या जलपर्णींमुळे नागरिकांना डासांचा तसेच दुर्गंधीचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. रोगराईने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार प्रशासनाला तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याच्याच निषेधार्थ शिवसेना नगरसेवक सचिन भोसले हे आज (दि.१८) महापालिका मुख्यालयात दाखल झाले. गळ्यात जलपर्णींचा हार घालून त्यांनी यावेळी प्रशासनाचा निषेध केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेची आज सर्वसाधारण सभा होती. नगरसेवक सचिन भोसले यांनी जलपर्णींचा हार गळ्यात घालून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेत दाखल झाले होते. यावेळी मुख्यालयातील प्रवेशव्दारावर सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. त्यावेळी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान नगरसेवक भोसले यांनी जलपर्णींसह सभागृहाबाहेरच ठिय्या मांडत प्रशासनाचा निषेध केला.
दरम्यान, आंदोलनावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सचिन भोसले यांची भेट घेऊन लवकरच जलपर्णी काढण्यात येईल, त्यासाठी संबंधितांना सूचना केल्या जातील असे आश्वासन ढाकणे यांनी यावेळी दिले.
जलपर्णी न काढल्यास आणखी तीव्र आंदोलन करू..
जलपर्णी मूळ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने शहरातील जलपर्णी न काढल्यास येत्या काळात शिवसेनेच्या वतीने आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सचिन भोसले – नगरसेवक शिवसेना






















Join Our Whatsapp Group