पिंपरी (Pclive7.com):- तळवडे हद्दीतील छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज व्यावसायिकांसाठी स्थानिक तरुणांनी स्थापन केलेल्या भैरवनाथ टेम्पो स्टँडचे उदघाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजप युवा मोर्चाचे सचिव किरण नखाते यांच्या पुढाकारातून या स्टँडची स्थापना करण्यात आली.
या स्टँडच्या माध्यमातून रुपीनगर आणि तळवडे येथील स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. तसेच परिसरातील छोट्या मोठया व्यवसायिकांनाही माळ वाहतुकीसाठी जवळच टँपो उपलब्ध होणार असल्याची माहिती किरण नखाते यांनी दिली.
फ प्रभाग समिती अध्यक्ष कुंदन गायकवाड, नगरसेविका स्विनल म्हेत्रे, साधना मळेकर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, संतोष मोरे, शांताराम भालेकर, पांडुरंग भालेकर, युवा नेते विनायक मोरे, सामाजिक कार्यकर्ते एस. डी. भालेकर, रमेश भालेकर, विलास भालेकर, वनदेव खामकर, उद्योजक भाऊराव सागावकर, दिलीप पांढरकर, किसन बावकर, बंटी भालेकर, अंकुश मळेकर, संजय भालेकर, आबासाहेब बांगर, रामदास कुटे, महेंद्र भालेकर, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. किरण नखाते यांनी आभार मानले.






















Join Our Whatsapp Group