पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्या प्रयत्नातून जुनी सांगवी येथील कै. शकुंतलाबाई शितोळे शाळा याठिकाणी मोफत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या परिसरात सध्या तीन ठिकाणी कोविड लसीकरण सुरू असून १ एप्रिल पासून वय वर्षे ४५ पुढील सर्वांना या केंद्रातून लसीकरण करण्यात येत आहे. जुनी सांगवी येथे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पालिका शाळा, सांगवी रुग्णालय, कै.शकुंतलाबाई शितोळे शाळा या तीन ठिकाणी लसीकरण सुरू आहे.
याचबरोबर दापोडी, पिंपळे गुरव येथे लसीकरण केंद्र सुरू आहेत. तर सामाजिक राजकीय मंडळींनीही जनजागृती करून पुढाकार घेतल्याने लसीकरण करुन घेण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. काही महिन्यांपूर्वी सोशल मिडिया वरील चुकीच्या माहितीमुळे काही नागरिक लसीबाबत विनाकारण भिती बाळगत होते. यामुळे लसीकरण काही ठिकाणी संथ गतीने सुरू होते. मात्र सामाजिक राजकीय मंडळींकडूनही जनजागृती होत असल्याने परिसरात लसिकरणासाठी नागरीक पुढे येत आहेत.
लसीकरण ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येत असल्याने नागरिकांनी थेट लसीकरण केंद्रावर आधारकार्ड घेवून जाऊन लस घ्यावी असे सांगवी रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
आम्ही जबाबदारी घेतो, तुम्ही खबरदारी घ्या.. या उपक्रमांतर्गत विकलांग, अपंग, दिव्यांगाना आमच्याकडून लसीकरण केंद्र ते घर अशी ये-जा करण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे.
प्रशांत शितोळे – माजी नगरसेवक जुनी सांगवी.
लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद वाढतो आहे. नागरिकांनी न घाबरता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसिकरण करून घ्यावे.
डॉ.विजया आंबेडकर – ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, सांगवी रूग्णालय.






















Join Our Whatsapp Group