रेमडिसिव्हर इंजेक्शन अधिक दराने विकल्याने कारणे दाखवा नोटीस; आदित्य बिर्ला, लोकमान्य हॉस्पिटल व पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचा समावेश
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील तीन खाजगी रूग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन रूग्णालयाबाहेर उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना अधिक किंमतीने विकत असल्याचे निदर्शनास आल्याने ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे की, या तीन रुग्णालयामध्ये आदित्य बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पीटल यांचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पिंपरी येथील डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पीटलचे अधिष्ठाता तथा वैद्यकिय अधिक्षक यांचा समावेश आहे.
सध्याच्या परिस्थितीत रेमडेसिवर इंजेक्शन अधिक दराने विकले जातात असल्याने लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामध्येच रेमडेसिवीर इंजेक्शन रू्णालयाबाहेर उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना अधिक किंमतीने विकत असल्याचे निदर्शनास आरेमडेसिवीर इंजेक्शन रूग्णालयाबाहेर उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना अधिक किंमतीने विकत असल्याचे निदर्शनास आले आहे.
याची सखोल चौकशी करुन पुढील ४८ तासात झालेल्या घटनेचा अहवाल द्यावा, असे नोटीसीत नमुद केले आहे. साथरोग अधिनियम, १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत आपणा विरूध्द आवश्यक कारवाई का करू नये असे देखील नोटीसीत नमुद करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group