पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत पावलेले पिंपरी चिचवड महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वारसांना विमा योजनेच्या अर्थसहाय्याचे धनादेश आज (दि.१५) महापौर माई ढोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
कोरोनाच्या या संकटकाळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक साईनाथ लाखे, स्टाफनर्स शोभा भुजबळ, एम.पी.डब्लू भालचंद्र राऊत, रखवालदार तायप्पा बहिरवाडे, तानाजी धुमाळ, शिपाई संभाजी पवार, लिफ्टमन मोहंम्मद शेख,क्लिनर अनिल ठाकुर, वार्ड बॉय ज्ञानेश्वर जाधव, मजुर अनंत कळबांटे, हनुमंत वाडेकर, मारुती शेंडगे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या वारसांना विमा योजनेनुसार आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते अर्थ सहाय्याचे धनादेश प्रदान करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक शत्रुघ्न काटे, अभिषेक बारणे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, अविनाश ढमाले, कामगार कल्याण विभागाच्या लिपिक माया वाकडे आदी उपस्थित होते.