पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील वाहन चालक ‘मारूती जाधव’ या कोविड योध्दाने अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केलायं. कोरोनाच्या या संकटात सामाजिक भान राखत वाढदिवसानिमित्त पिंपरी येथे वैद्यकीय साहित्य भेट दिले. तसेच प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करत स्वत: देखील प्लाझ्मा दाने केले.
या प्लाझ्मा दान शिबिरात दात्यांनी उत्साहात मोठ्या संख्येने प्लाझ्मा दान केले. एकूण १५ दात्यांनी कोविड प्लाझ्मा डोनेशनसाठी संकल्प केला व दान केले.
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल येथील रक्तपेढी येथे शिबिराचे आयोजन करण्यात होते. वैद्यकीय साहित्य वाटप व प्लाझ्मा दान शिबिराच्या माध्यमातून कोरोनाच्या संकट कालावधीमध्ये गरजू रूग्णांना प्लाझ्मा उपलब्ध व्हावे यासाठी आमदार महेश लांडगे व डॉ. विनायक पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत १५ दात्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. यामुळे अनेक कोरोनाग्रतांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होणार असल्यामुळे दात्यांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल यशवंत कण्हेरे यांनी आभार मानले.
आम्ही संकल्पपत्र दिलेल्या दात्यांच्या माध्यमातून आवश्यक त्या रक्तगटाचा प्लाझ्मा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते समन्वय साधू आणि अजूनही दात्यांची मोठ्या प्रमाणावर गरज असल्यामुळे प्लाझ्मा दान करू इच्छिणाऱ्या दात्यांनी पुढे यावे असे आवाहन शिवानंद चौगुले यांनी केले.
आमदार महेश लांडगे यांच्या शुभहस्ते भोसरीतील नवीन रूग्णालय येथे वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलचे डॉ. विनायक पाटील, डॉ.ढगे सर, डॉ. वैभव म्हस्के, डॉ. ज्ञानेश पाटील तसेच प्रसाद डमढेरे, विशाल गरड व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group