पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना महामारीच्या काळात महिलांसाठी ‘रुद्र महिला प्रतिष्ठान व कादंबरी महिला प्रतिष्ठान’च्या वतीने आरोग्य शिबिर राबविण्यात आले.
कोरोनाच्या या संकट काळामध्ये महिलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी युनिटी पॉवर व लोह-कॅल्शियम, डी-सी जीवनसत्व अशा प्रकारच्या गोळ्याचे वाटप या महिलांना करण्यात आल्या. तसेच परिसरातील सर्व महिला बचत गटांना मास्कचे वाटप करून त्याचे महत्त्व सांगण्यात आले. या शिबिराचे आयोजन सुप्रिया शशांक साळवी (काटे), अस्मिता असित कांबळे मोरे यांनी केले होते. यावेळी सर्व महिला बचत गट पदाधिकारी गट प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा पक्ष निरीक्षक कविताताई संदेश आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विनोद कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष योगेश आबा आयवळे, प्रभाग क्रमांक ३० राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी अध्यक्ष गुरुदत्त जाधव, मयूर कांबळे, बचतगट महासंघाच्या अध्यक्षा जन्नत बी सय्यद, पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष लुकस आण्णा मुकुटमल तसेच दापोडी परिसरातील महिला उपस्थित होत्या.






















Join Our Whatsapp Group