पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ बढती द्यावी अशा मागणीचे निवेदन पिंपरी युवासेनेकडून आयुक्त राजेश पाटील यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कामाला असलेल्या कर्मचा-यांपैकी अनेक कर्मचारी हे बढतीस पात्र असून देखील त्यांना बढती न देता आहे. त्याच पदावर वर्षानुवर्षे काम करावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर व एकूणच कामकाजावर परिणाम दिसून येत आहे.
मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालय यांचे निर्णय देखील अशा कर्मचा-यांच्या बाजूने असताना देखील त्यांना बढतीमध्ये डावण्यात येत आहे. तरी दिनांक ७ मे २०२१ रोजीचा शासन आदेश तात्काळ अंमलबजावणी करून पात्र कर्मचा-यांना तात्काळ बढती देण्यात यावी असे निवेदन पिंपरी युवासेनाचे विभागसंघटक निलेश हाके ह्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले.