पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना आज (बुधवारी, दि.१२) दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशन जवळ घडली.
तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समजते. आरोपीने पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशन जवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तूलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. पोलीस तपास करीत आहेत.